पुणे

कळसच्या आखाड्याचा कालिचरण विजेता

CD

कळस, ता. १६ : कळस (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री हरणेश्‍वर यात्रेनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले. यात्रेनिमित्त गावातील सर्व ग्रामदैवतांच्या मंदिरांना विद्युत रोषणाई केली होती. यावेळी झालेल्या आखाड्यात कालिचरण सोलनकरने बाजी मारली.
सोमवारी (ता. १३) वरुथिनी एकादशी दिवशी देवाची महापूजा व अभिषेक झाला. यानंतर यात्रेस सुरुवात झाली. सायंकाळी देवाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना मिरवणूक निघाली. येथील सुतार कारागिरांनी गव्हाच्या काडापासून बनविलेल्या हत्तीच्या प्रतिकृतीची सजावट करून काढलेली मिरवणूक मुख्य आकर्षण होती. मिरवणुकीनंतर बाजारतळावर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे तर शाळेच्या पटांगणावर पुरुषांसाठी लोकनाट्य तमाशा या मनोरंजनाचे कार्यक्रम झाले.
मंगळवारी (ता. १४) सकाळी देवाची पूजा झाली. यावेळी भाविकांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी केली होती. अनेकांनी नवसपूर्तीसाठी गूळ व पेढ्यांच्या शेरणीचे वाटप केले. दुपारी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन केले होते. यामध्ये लहान-मोठ्या दोनशेहून अधिक कुस्त्या पार पडल्या. प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी कालिचरण सोलनकर व श्रीमंत भोसले यांच्यामध्ये कुस्ती झाली. यामध्ये कालिचरणने भोसलेला अस्मान दाखवले. कुस्त्यांच्या आखाड्यानंतर रात्री शाळेच्या पटांगणावर मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी प्रक्रिया सुरू

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

IPL 2026: रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, पण मग मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करणार कोण? या खेळाडूंचा पर्याय

SCROLL FOR NEXT