पुणे

भानोबा देवाचे कुसेगावात उत्साहात आगमन

CD

कानगाव, ता. २६ : कुसेगाव (ता. दौंड) येथे मंगळवारी (ता. २५) श्री भानोबा देवाचे उत्साहात आगमन झाले. वर्षभर कोयाळी या गावात असणाऱ्या भानोबा देवाचे मामाच्या गावी अर्थात आजोळी आगमन झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण झाले आहे.
कोयाळी गावची यात्रा संपल्यानंतर कोयाळी ते कुसेगाव अशी तीन दिवसांची पायी वारी करत गावातील भाविक भक्तांसहित देवाचे गावात आगमन झाले. भक्तांनी पारंपरिक नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांच्या आतषबाजीत भानोबा देवाचे स्वागत झाले. भानोबा देव गावात १५ दिवस राहणार असल्याने आसपासच्या परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे गाव गजबजून गेला आहे.
कुसेगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत भानोबा देवाची यात्रा शुक्रवार (ता. ५) आणि शनिवारी (ता. ६) आहे. या पार्श्‍वभूमीवर गावात जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेचा राज्यभरात नावलौकिक आहे. देव-दानव युद्ध यात्रेचे मुख्य आकर्षण आहे. राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे गावाला एक आगळी वेगळी शोभा येते. यात्रेनिमित्त गावात, भानोबा देवाच्या मंदिराला आणि गावातील सर्व मंदिरांना विद्युत रोषणाई, साफसफाई केली आहे. यात्रेसाठी गाव सज्ज झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT