कानगाव, ता. १४ : दौंड तालुक्यातील पाटस येथे महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे शनिवारी (ता. १४) आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १०७३ लाभार्थ्यांना महसूल विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात आला. नवीन ८३ विविध प्रकारचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली
पाटस येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन दौंडचे उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या हस्ते झाले. यावेळी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, निवासी नायब तहसीलदार तुषार बोरकर, नायब तहसीलदार ममता भंडारी, पुरवठा अधिकारी मुकेश्वर निमजे, पुरवठा निरीक्षक पंकज गोरे, गोदाम व्यवस्थापक योगेश सकट, तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वला जाधव, मंडल अधिकारी संगीता खराटे, पाटस मंडळातील ग्राम महसूल अधिकारी संजय खाडे, शाहीन सय्यद, गौरी बहाकर, राहुल गुळवे, दादासाहेब आगम, रोहन गबाले, बापू जाधव यांच्यासह पाटस व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महा-ई-सेवा केंद्रचालक, आधार केंद्रचालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटस मंडळातील मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व महा-ई-सेवा केंद्र चालक यांनी प्रयत्न केले. तहसीलदार अरुण शेलार यांनी प्रास्ताविक केले, तर नायब तहसीलदार तुषार बोरकर यांनी आभार मानले.
ज्येष्ठांसाठी कायदा मजबूत आहे. ज्येष्ठांना जर त्यांची मुले सांभाळत नसतील तर त्यांच्या मुलांच्या नावे वडिलोपार्जित मालमत्ता त्या ज्येष्ठ नागरिकांना परत करण्याचे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अधिकार आहेत. तालुक्यात कोणीही असे वयोवृद्ध नागरिक असतील तर त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घ्यावी त्यांना नक्कीच न्याय मिळवून दिला जाईल.
- रेवणनाथ लबडे, उपविभागीय अधिकारी, दौंड
निकाली काढण्यात आलेले अर्ज
फेरफार मंजुरी : ९२
जिवंत सातबारे : ५७
राजपत्र : ३३
क्षेत्र दुरुस्ती : २०
तक्रार नोंदी तडजोड प्रकरणे : ०२
हक्क सोड : २०
रस्ते आदेश : ०५
अ पा क शेरा कमी : ०७
योजनेचे प्रमाणपत्र वाटप :
संजय गांधी : ६६
जातीचे दाखले : ४५
उत्पन्न दाखले : ३६०
नॉन क्रिमीलेअर : ६०
डोमिसाईल : १८०
नवीन शिधापत्रिका : २३
अन्नसुरक्षा योजना : ०३
शिधापत्रिका संदर्भातील कामे : १९
आधार कार्ड : ८१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.