पुणे

पाटसला तरुणाकडून अमली पदार्थ जप्त

CD

कानगाव / पाटस, ता. २३ : दौंड तालुक्यातील पाटस परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी फिरत असलेल्या एका तरुणाला यवत पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मेफेड्रोन (एम.डी.) हा अमली पदार्थ जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस येथे खडकवासला कालव्याजवळ एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार यवत पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत आदित्य अंकुश माने (वय २४, रा. पाटस) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ३७ हजार ८०० रुपये किमतीचा मेफेड्रोन आढळला. तो जप्त केला. त्याचे वजन सुमारे १.८९ ग्रॅम असून, आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे २० हजार रुपये प्रतिग्रॅम इतके आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मारुती मेटलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे, सहाय्यक फौजदार महेंद्र फणसे, पोलिस हवालदार गुरुनाथ गायकवाड, विकास कापरे, शौकत मद्दी, विनोद काळे, जालिंदर बंडगर या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Deploys 12 Nuclear Warheads: दुनियावालों हमें बचाओ! भारताने इतिहासात पहिल्यांदाच गोदामातून काढले १२ अणुबॉम्ब; पाकची भीतीने गाळण

नुकताच साजरा केला वाढदिवस; किती वर्षांची झाली तेजश्री प्रधान? फोटो शेअर करत सांगितलं स्वतःचं खरं वय

IND vs AFG: उद्यापासून वन-डेचा थरार! टीव्ही अन् मोबाईलवर LIVE मॅच कधी, कुठे पाहायची? जाणून घ्या वेळ

Kalyan: निर्दयीपणाचा कळस! जन्मानंतर अवघ्या सहा दिवसांतच चिमुकलीला कचऱ्यात टाकलं; कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना

१.७ लाखांचा पगार... तरी महिनाअखेर खात्यात उरतात फक्त २,५२० रुपये; प्रत्येक मध्यमवर्गीयाने वाचावी अशी गोष्ट

SCROLL FOR NEXT