कोरेगाव भीमा, ता. ३ : ‘‘ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास होतो आहे, त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर, जाहिरातींवर नसावा, हा तमाम शंभुभक्तांचा, त्यांच्या भावनांचा अपमान आहे. सोहळ्याला राजकीय इव्हेंट बनवला,’’ अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका केली.
वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील शौर्यतीर्थावर भूमिपूजन पार पडल्यानंतर तुळापूर येथे आयोजित जाहीर कार्यक्रमातून निघून जात खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘खरं तरं नगरला छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास उलगडून दाखविणारे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग होत आहेत. त्यामुळे मला नगरला वेळेत पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे आपण कार्यक्रमातून निघून गेलो. त्याचबरोबर निधी दिला म्हणजे विकास होतो, अशी कार्यक्रम आयोजित केलेल्यांची समजूत झाली असेल. निधी दिला तर त्यातून इमारत उभी राहते, पण स्मारकाची प्रेरणा ही जिवंत चैतन्यातून मिळते, हेच चैतन्य जागविण्यासाठी आता नगरमध्ये जात आहे. मात्र, काही लोकं १५ वर्षे या भागाचे खासदार होते. स्वतः अजितदादा साडेतेरा वर्षे पालकमंत्री होते. त्यावेळी या स्मारकाचे काम का झाले नाही?’’
या भूमिपूजन सोहळ्याची कार्यक्रमाच्या निमंत्रणाची पत्रिका आदल्यादिवशी रात्री उशिरा १०.४२ वाजता मिळाली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा विषय आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याने आपण या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहिलो. मी आणि आमदार अशोक पवार यांनी सातत्याने या समाधीस्थळाचा विकास व्हावा, यासाठी मागणी व पाठपुरावा केला. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर हे भूमिपूजन होत आहे. त्यासाठी मनापासून आभारी आहे. कोनशिलेवर नाव नसलं; तरी काळजावर कुणाचं नाव कोरलंय, हे मायबाप जनता जाणते.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.