पुणे

न्हावी सांडसमध्ये सत्तर टक्के मतदान

CD

केसनंद, ता. १३ : न्हावी सांडस येथे सुमारे ७० टक्के तर मोठी गावे असलेल्या पेरणे व लोणीकंद येथे ५८ टक्के व केसनंद येथे ४५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. मतदानाच्या तुलनेत दिवसभरात फार मोठ्या रांगा अथवा गर्दी दिसून आली नाही.

सध्या वाढत्या उन्हाचा चटका, दुपारनंतर पावसाची शक्यता तसेच शेतातील कामांच्या व्यापामुळे पूर्व हवेलीच्या ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदार मतदानाला बाहेर पडले. त्यामुळे दुपारपर्यंत काही गावात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत मतदान झाले. तर दिवसभर कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी परिश्रम घेताना दिसत होते.

लोणीकंद येथे ६४४७ पैकी ५८ टक्के म्हणजे ३७५६ मतदारांनी मतदान केले. बुर्केगावात १६४३ पैकी ६८ टक्के म्हणजे ११०२ मतदान झाले. शिरसवडीत ६५ टक्के, तसेच पिंपरी सांडसमध्ये २८७० पैकी १७७५ म्हणजे सुमारे ५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर १० हजार ७७४ मतदार असलेल्या केसनंद येथे साधारण ४५.७२ टक्के म्हणजे ४९२६ मतदार मतदानासाठी आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT