पुणे

वाघोलीतील समस्यांवर कार्यवाहीचे मंत्र्यांचे आदेश

CD

केसनंद, ता. १० : पुणे - नगर हमरस्त्यावर वाघोली परिसरात होणारी वाहतूक कोंडी तसेच ड्रेनेजअभावी रस्त्यावर साठणाऱ्या पाण्यासह विविध प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.
नगर हमरस्त्यावर रोजच थांबणाऱ्या प्रवासी बसेसमुळे वाघोली परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होते. तसेच ड्रेनेजअभावी रस्त्यावर पाणीही साठते. यासह वाघोली गावातीलही विविध समस्या सोडवण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पाठपुरावा केला. मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण, महावितरण पोलिस, पीएमपी यांसह सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी थेट कार्यवाहीच्या सूचना मंत्री उदय सामंत यांनी संबंधित विभागांना दिल्या. यात वाघोलीत हमरस्त्यांवर थांबणाऱ्या खासगी बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी व त्यासंदर्भात पोलिस विभागाने पुढाकार घेऊन तातडीने कार्यवाही करावी, तसेच ड्रेनेजसाठीही येत्या आठ दिवसात रस्त्यांचे रेखांकन करून जागा देण्याचे निर्देशही मंत्री उदय सामंत यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांनो, अजून किती वाट पाहणार? PMRDA चे ३,९०६ कोटींचे प्रकल्प अजूनही रखडले, घोषणा फक्त कागदावरच..

Engineering CAP Result: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज! जाणून घ्या महत्त्वाच्या पायऱ्या

Latest Marathi News Live Update : नागपुरात E20 विरोधात गडकरींच्या घरासमोर युवक काॅंग्रेस आक्रमक

Raigad News: रिल्सच्या नादात जीव गमावला, धबधब्यात पाय घसरून खोल दरीत कोसळला; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, Video Viral

Tomato Market: 'लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी टोमॅटो हंगाम ठरला फायदेशीर

SCROLL FOR NEXT