केसनंद, ता. १७ : विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आवश्यक ती जनजागृती करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी, यादृष्टीने मतदान जनजागृतीसाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी सोमवारी (ता.१८) पूर्वी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे, असे निर्देश सहकारी संस्थांचे पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिले. या सभेप्रसंगी मतदान टक्केवारीत वाढीच्या दृष्टीने विविध विषय मांडण्यात यावेत. यामध्ये ग्रामीण संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत सर्व गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्याचे काम सुरू आहे. या चिठ्ठीचे वाटप प्रत्येक सभासदापर्यंत होणे आवश्यक आहे. याबाबतही संस्था पदाधिकाऱ्यांनी खात्री घ्यावी. ज्या ठिकाणी मतदार ओळख चिठ्ठी अद्यापही पोहोचल्या नाहीत, अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) सुलभरीत्या वितरित करण्याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात. शक्य असल्यास वृद्ध व दिव्यांग यांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरिता वाहन उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य करावे.
सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मतदानास पात्र असलेल्या सभासदांची यादी तयार करून त्यांना व्हॉटसअप, ई- मेल आदी मार्गाने मतदानासाठी प्रवृत्त करण्याबाबत संस्थांना सूचना देण्यात याव्यात. संस्थेतील सूचना फलकावर अथवा दर्शनी भागात जागृतीपर पोस्टर प्रसिद्ध करावे. त्यामध्ये मतदानाच्या दिनांकाचा उल्लेख करावा. गृहनिर्माण संस्थांनी मतदान केलेल्या सभासदांना पुष्प देऊन अभिनंदन करावे. मतदानाची वेळ संपल्यावर संस्थांनी प्रथमच मतदान केलेल्या युवक-युवतींना सन्मानित करावे व त्यांचे अभिनंदन करावे, असे आवाहनही जगताप यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.