केसनंद, ता. १३ : ‘‘लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने टाकलेली विश्वासार्हता दर्जेदार विकासकामातून टिकवली पाहिजे, त्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह सर्वांनीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेकोर कामाची पद्धत आत्मसात करावी. नागरिकांसाठी शासनाच्या योजना अधिकाधिक राबविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा योग्य सन्मान केला जाईल,’’ अशीही ग्वाही आमदार माऊली कटके यांनी दिली.
शिरूर- हवेली मतदारसंघातील गावांचे मूलभूत प्रश्न सुटावेत, या उद्देशाने आमदार कटके यांच्या अध्यक्षतेखाली हवेली गटातील ग्रामपंचायतींच्या केसनंद येथे झालेल्या समन्वय सभेत ते बोलत होते. ‘नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करा, पारदर्शक पद्धतीने सर्वांना योग्य न्याय द्या, दिव्यांग नागरिकांना प्रामुख्याने प्राधान्य द्या, कृषी विभागाच्या योजनांची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा,’ अशाही सूचना यावेळी आमदार कटके यांनी दिल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, गटविकास अधिकारी भूषण जोशी, बांधकाम उपअभियंता गित्ते, केसनंदचे सरपंच धनाजी हरगुडे, माजी सरपंच संतोष हरगुडे, दत्ताआबा हरगुडे, बाबासाहेब हरगुडे, दिनेश झांबरे, मच्छिंद्र सातव उपस्थित होते.
‘अल्पावधीत अधिकाधिक निधी मतदार संघात आणला असून अजूनही निधीसाठी पाठपुरावा सुरु आहे. महिला बचतगट, गावांतील शिवरस्ते, पाणंद रस्ते यासाठीचे प्रस्तावही पाठवावेत. कमतरता व रिक्त ठिकाणी कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठीही पाठपुरावा करीत असून, शिक्षण व आरोग्य विभागावर सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. ‘सीएसआर’अंतर्गतही निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत,’ असे कटके यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.