पुणे

वढू बुद्रुक येथे मुरुमाचा भराव गेला वाहून

CD

कोरेगाव भीमा, ता. २७ : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) ते पिंपळे जगताप-चौफुला दरम्यान सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणादरम्यान नव्या मोरीच्या कामामुळे बाह्यवळणासाठी तयार केलेला तात्पुरता मुरुमाचा भराव काल ओढ्याच्या पुरामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अद्यापही बंदच असून दोन्ही बाजूकडील ग्रामस्थांना पर्यायी मार्गाने शिक्रापूर मार्गे वळसा घालून जावे लागत आहे.

पावसाचा धोका माहीत असताना ठेकेदाराच्या ढिसाळपणामुळे ही परिस्थिती ओढवल्याने प्रवासी व ग्रामस्थ संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. वढू बुद्रुक ते पिंपळे जगताप - चौफुला दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून रेंगाळले असून काँक्रिटीकरणाच्या आलेल्या लोखंडी सळया व मुरुमाच्या रस्त्यावरून अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवासी व ग्रामस्थांना मोठी कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. या कामात वढू जवळ नव्या मोरीच्या कामासाठी जुना रस्ता मोरीसह उखडून बाह्यवळणासाठी तात्पुरत्या स्वरूपात मुरुमाचा भराव टाकण्यात आला होता. मात्र सलग दोन-तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे काल ओढ्याला आलेल्या पुरात हा भराव वाहून गेला असून शेजारील शेतकऱ्यांच्या गोठ्यात व घरातही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे भराव वाहून गेल्याने दोन्ही बाजूकडील बंद झालेली या मार्गावरील वाहतूक अद्यापही सुरु झालेली नाही. त्यामुळे चांगल्या रस्त्यासाठी ग्रामस्थांना पर्यायी मार्गाने शिक्रापूर मार्गेच वळसा घालून जावे लागत आहे.
नागरिकांच्या या त्रासाला व नुकसानीला कारणीभूत ठरलेल्या या ठेकेदारावर कारवाई व्हावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान सरपंच ज्ञानेश्वर भंडारे, ग्रामसेवक शंकर भाकरे, तलाठी रमेश घोडे, पोलिस पाटील जयसिंग भंडारे आदींनी आज प्रत्यक्ष जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच हा रस्ता लवकरात लवकर पुर्ववत करण्यासाठी व वाहून गेलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे.

04940

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT