पुणे

विजयस्तंभ परिसराची पाहणी; नियोजनाचा आढावा

CD

कोरेगाव भीमा, ता.१४ : येत्या एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिमंडल ४ चे पोलिस उपआयुक्त सोमय मुंडे यांनी विजयस्तंभ परिसरात पाहणी करून कार्यक्रमाशी संबंधित घटकांशी चर्चा करीत बंदोबस्त व सुविधा नियोजनाचा आढावाही घेतला.
विजयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमासाठी शहर पोलिसांकडून चोख पोलिस बंदोबस्त व व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने शुक्रवारी (ता १४ ) मुंडे यांनी विजयस्तंभ परिसरात पाहणी तसेच परिसरातील व्यवस्थेचा नियोजन आराखडा पाहून अभिवादन दिन कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील गावांचे पोलिस पाटील आदींसह संबंधित घटकांशी चर्चा करीत अभिवादनासाठी येणाऱ्या बांधवांना आवश्यक सोयीसुविधा, वाहतूक नियोजन, चोख बंदोबस्त, पुरेसे वाहन पार्किंग यासह विविध विषयांच्या नियोजनाबाबत संबंधितांना सूचनाही केल्या. या चर्चेवेळी सर्वात महत्त्वाचे असलेले वाहतूक नियोजन, व्हीआयपी मार्ग, चोख सुरक्षा व्यवस्था, प्रशस्त वाहनतळ व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसेस, बॅरिकेड्स, स्वागत मंडप, बुक्स स्टॉल, हिरकणी कक्ष यासह येणाऱ्या बांधवांची मोठी संख्या व थंडीचे जास्त प्रमाण याबाबतही चर्चा करण्यात आली. तर विजयस्तंभ परिसरात ऊस शेतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे बिबट्याच्या समस्येकडेही लक्ष वेधण्यात आले. या बैठकीस लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार व इतर पोलिस अधिकारी, परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलिस पाटील तसेच अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


05201

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT