पुणे

ऊसतोड कामगाराच्या झोपडीमध्ये शिरला बिबट्या

CD

केसनंद, ता. २८ : डोंगरगाव (ता. हवेली) हद्दीत शुक्रवारी (ता. २८) पहाटे तीनच्या सुमारास ऊसतोड कामगारांच्या वस्तीमधील झोपडीमध्ये शिरून हल्ला करण्याचा बिबट्याचा प्रयत्न सतर्क शेतमजूर
बाप-लेकाच्या जलद प्रतिकारामुळे फसला. दरम्यान, पिंजरा लावण्यास टाळाटाळ करणारे वनखाते बिबट्याकडून माणसे मरायची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल डोंगरगाव ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या घटनेत बिबट्याने मारलेल्या पंजामुळे भाईदास दाजमल ठाकरे (वय ६५, सध्या रा. डोंगरगाव, ता. हवेली) यांना डोक्याला जखम झाली आहे. या घटनेमुळे ऊसतोड कामगारांसह परिसरात खळबळ उडाली आहे.
मूळचे धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील परसुळे येथील राहणारे व सध्या डोंगरगाव येथे ऊस तोडणीसाठी आलेले भाईदास ठाकरे हे त्यांच्या झोपडीत मुलासह झोपलेले असताना पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने झोपडीत शिरून त्यांच्या डोक्यावर पंजा मारत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात त्यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, याच वेळी शेजारीच झोपलेला त्यांचा मुलगा अर्जुन (वय २५) हाही जागा झाल्याने दोघांना पाहून बिबट्याने पलायन केले. केवळ डोक्यावर जाड कानटोपी असल्याने ते बचावले मात्र बिबट्याने जोरदार मारलेल्या पंजामुळे भाईदास ठाकरे यांना डोक्यास जखम झाली असून त्यांच्यावर पेरणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दरम्यान, याबाबत हवेली तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही अपेक्षित प्रतिसाद नाही
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असलेल्या भीमा नदीकाठच्या पेरणे-डोंगरगाव तसेच वढू खुर्द परिसरामध्ये आता पाळीव प्राण्यांची शिकार मिळत नसल्याने बिबट्याने आता भक्ष्यासाठी आता मानवी वस्तीमध्ये प्रवेश करायला सुरुवात केल्याने या परिसरातील नागरिक तसेच ऊसतोड कामगारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. अनेक दिवसांपासून पेरणे तसे डोंगरगाव ग्रामस्थ बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करत आहेत; मात्र वन खात्याकडून याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही पाठपुरावा केला तरी त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


5225

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT