पुणे

हातभट्टी लावणाऱ्या आरोपीवर लोणीकंद पोलिसांची कारवाई

CD

केसनंद, ता. ४ : लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी लावणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भुऱ्या गब्बर राजपूत (वय २३, रा. वाडेगाव बुद्धविहाराजवळ, ता. हवेली) याच्यावर शहर पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. यानुसार, त्याला एका वर्षाकरिता छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भुऱ्या गब्बर रजपूत याच्यावर मागील सहा महिन्यात हातभट्टी लावून दारू तयार केल्याबाबत लोणीकंद पोलिस ठाणे येथे एकूण चार गुन्हे दाखल होते. त्याच्यावर वेळोवेळी कारवाई करूनदेखील त्याची गुन्हेगारी कृत्ये थांबत नव्हती. त्याच्या या कृत्यामुळे समाजातील सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. यावर योग्य प्रतिबंध होण्याकरिता ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीत हातभट्टीवाले गुन्हेगार आढळल्यास त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्याचा इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी दिला आहे.
पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त निकिता पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश घोरपडे, पोलिस नाईक गणेश दळवी, पोलिस हवालदार शुभम सातव, पोलिस शिपाई राजश्री बेलेकर, पोलिस हवालदार संदीप सांगडे, पोलिस शिपाई बाबासाहेब गोसावी, आशिष लोहार, निखिल गोपाळे, मल्हारी सुपुरे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थप्पड प्रकरणातून हरभजन सिंगने कमावले कोट्यवधी रुपये, श्रीसंतचा मोठा दावा

Dhule Solapur Highway Accident : अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; 18 वर्षीय तरुणीला ट्रकनं चिरडलं, 250 फुटांपर्यंत नेलं फरफटत

IPL 2026 : मुंबई इंडियन्स कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची हकालपट्टी केव्हा करणार? दिग्गज खेळाडूचा थेट सवाल

UP ATS: आजोबा आझाद हिंद फौजेत, पण नातू निघाला दहशतवादी! नोएडाच्या तुषार चौहानचा 'हिजबुल्लाह' कसा झाला?

Metro 5 : कल्याण ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावणार, १८ हजार कोटींच्या निधीला मंजूरी; कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT