पुणे

हवेलीत राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान

CD

शरद पाबळे : सकाळ वृत्तसेवा
केसनंद, ता. १४ : हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विधानसभेप्रमाणे महायुती- आघाडी न झाल्यास महापालिका निवडणुकीप्रमाणे प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्येच लढत रंगण्याचे चित्र आहे. तसे झाल्यास हवेलीत राजकीय वर्चस्वासाठी प्रस्थापित राष्ट्रवादीला भाजपचेच मोठे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार माउली कटके आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूक, तसेच महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी, तसेच भाजप स्वतंत्र लढल्याने तेच समीकरण याही निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवेलीत शिरूर- हवेलीचे आमदार माउली कटके, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप आदींसह तालुक्यातील प्रमुख पक्षांच्या नेते याच पक्षीय समीकरणानुसार या निवडणुकीबाबत आपापल्या वरीष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.
हवेलीत शहरालगतची वाघोली, मांजरीसारख्या मोठ्या लोकसंख्येची गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने पेरणे- लोणीकंद, कोरेगाव मूळ- केसनंद, उरुळी कांचन- सोरतापवाडी, थेऊर- आव्हाळवाडी, लोणी काळभोर- कदमवाकवस्ती, खेड शिवापूर- खानापूर हे एकूण फक्त ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गण अस्तित्वात आले आहेत. पंचायत समितीचे सभापतिपद खुले झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गाच्या थेऊर, केसनंद, कोरेगाव मूळ तसेच खानापूर गणातील इच्छुकांमध्ये अधिक चुरस पाहायला मिळू शकते.
प्रदिप कंद यांचे गाव असलेल्या पेरणे- लोणीकंद जिल्हा परिषद गटातही तीन प्रबळ दावेदार जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असल्याने या गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. स्वतः प्रदीप कंद, आमदार कटके यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत असणार आहे.
या पूर्वी पेरणे- वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केलेल्या जिल्हा परिषद सदस्या कल्पना सुभाष जगताप यांचा पेरणे गण यावेळी फेररचनेत वाडेबोल्हाईऐवजी लोणीकंदला जोडला गेला आहे. तर, आव्हाळवाडी गणही सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने येथील प्रबळ पुरुष इच्छुक थंडावले आहेत. कदमवाकवस्ती (अनुसूचित जाती), उरुळी कांचन (अनुसूचित जाती महिला), सोरतापवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), लोणी काळभोर (मागास प्रवर्ग महिला), खेड शिवापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) या गटातही असे आरक्षण असल्याने बऱ्याच कालावधीपासून तयारी करत असलेल्या प्रस्थापित इच्छुकांच्या गोटात शांतता दिसत आहे.
गतवेळच्या निवडणुकीत पूर्व हवेलीत राष्ट्रवादीने तीन गटात विजय मिळवला होता, तर लोणी काळभोर गटातही राष्ट्रवादीच्याच बंडखोर गटाने बाजी मारली होती. मात्र, सध्या लोणी काळभोर- कदमवाकवस्ती हा गटच अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या गटात प्रस्थापित इच्छुकांच्या हालचाली थंडावल्या आहेत.
सध्या पुणे महापालिकेत समावेश झालेल्या तत्कालीन वाघोली गटातून आमदार कटके यांनी शिवसेनेची उमेदवारी घेत विजय मिळवला होता. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करीत आमदारकीलाही गवसणी घातली. परंतु त्यावेळी राज्यात महायुती, तसेच महाविकास पॅटर्न तयार झाला होता. मात्र, सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत विधानसभेप्रमाणे महायुती किंवा आघाडीची शक्यता कमी आहे. महापालिकेप्रमाणेच राष्ट्रवादी व भाजप यांच्यातच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. या दोघांकडून उमेदवारी न मिळालेल्या अन्य इच्छुक उमेदवारांना इतर पक्षाचा पर्याय खुला आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तळागाळापासून प्रयत्न करीत आहेत. जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीत प्रदिप कंद, तसेच पीएमआरडीए सदस्य निवडणुकीत भाजप सरचिटणीस स्वप्निल उंद्रे यांच्या यशाने भाजपचे कार्यकर्ते उत्साहात असले तरीही शहरालगतचा भाजपचा प्रभाव असलेला भाग महापालिकेत गेल्याने तसेच महापालिका निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप कसे आव्हान देते, याबाबतही उत्सुकता आहे.

जिल्हा परिषद गट आरक्षण पुढीलप्रमाणे : उरुळी कांचन -
सोरतापवाडी (अनुसूचित जाती), लोणी काळभोर- कदमवाकवस्ती (अनुसूचित जाती महिला), थेऊर- आव्हाळवाडी (इतर मागास प्रवर्ग महिला), पेरणे- लोणीकंद (नागरिकांचा मागास प्रवर्ग),
केसनंद- कोरेगावमूळ (सर्वसाधारण महिला), खेड शिवापूर- खानापूर (सर्वसाधारण महिला).

पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे : थेऊर (सर्वसाधारण), केसनंद (सर्वसाधारण), कोरेगावमूळ (सर्वसाधारण), खानापूर (सर्वसाधारण), लोणीकंद (सर्वसाधारण महिला), आव्हाळवाडी (सर्वसाधारण महिला), पेरणे (सर्वसाधारण महिला), कदमवाकवस्ती (अनुसूचित जाती), उरुळी कांचन (अनुसूचित जाती महिला), सोरतापवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), लोणी काळभोर (मागास प्रवर्ग महिला), खेड शिवापूर (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला).

पक्षीय बलाबल (२०१७) :
जिल्हा परिषद- राष्ट्रवादी काँग्रेस : ७, भाजप- ३, शिवसेना- २, अपक्ष - १
पंचायत समिती- राष्ट्रवादी काँग्रेस : १३, शिवसेना- ७, भाजप- ४, अपक्ष : २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

SCROLL FOR NEXT