पुणे

गॅलेक्सी स्कूलमध्ये रंगला पुणेरी लोककलेचा उत्सव

CD

केसनंद, ता. २० : लोणीकंद (ता. हवेली) येथील गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी लोककलेच्या उत्सवात पुणेरी संस्कृतीचेही दर्शन घडवले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पुण्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे व त्यांची पौराणिक व ऐतिहासिक माहिती सांगत विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादरीकरण केले. गाण्यांच्या व नृत्यांच्यामध्ये त्या-त्या धर्मस्थळांबद्दल चिमुकल्यांनी उत्तम माहितीही सांगितली. या लोककला उत्सवात मुलांनी पुण्याची परंपरा, सण, उत्सव, प्रसिद्ध व धार्मिक स्थळे यांची माहिती देताना गणपती, राधाकृष्ण, गोंधळ तसेच पंढरीची वारी या गाण्यांवर फेरही धरला. तर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विषयी चिमुकल्यांनी सादर केलेले अप्रतिम नाटक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. स्नेहसंमेलनाची सुरुवात मुख्याध्यापिका विद्या शिंदे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांनी समूह गायन आणि नृत्यही सादर केले. तर कार्यक्रमाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज तर समारोप छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने करण्यात आला.
आंतरश‌ालेय विविध स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्हे तसेच प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे शिक्षकांचा देखील प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन क्रिती शेट्टी यांनी केले.
यावेळी संस्थेच्या संस्थापिका अरुणा गुंरुजकर, खनिजदार नीलेश गुरुजकर, निळूभाऊ कंद, अनुराधा गुरुंजकर, निता कंद, सोनाली कंद आदींसह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT