केसनंद, ता. १९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दिवसभर श्रीक्षेत्र वढु-तुळापुरासह अहिल्यानगर रस्ता शिवज्याेत, मिरवणुकांनी गजबजून गेला होता.
शिवजयंतीनिमित्त आज सकाळपासूनच श्रीक्षेत्र वढु-तुळापुरात छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी विविध ठिकाणाहून शक्तीज्योतीचे आगमन तसेच प्रस्थान झाले. ढोल ताशा पथकांसह ज्याेत मिरवणुका तसेच शिवशंभूराजेंच्या जयजयकाराने वढु-तुळापुर व अहिल्यानगर रस्ता परिसर दुमदुमत होता. दुचाकी आणि चार चाकी वाहनांना भगवे झेंडे बांधून भगव्या फेट्यातील शिवशंभूभक्तांच्या घोषणांनी वढु-तुळापुर परिसर दणाणून गेला. यावेळी वढू-तुळापूर ग्रामस्थांकडून शंभुभक्तांचे स्वागत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.