केसनंद, ता. ११ : वाघोली-भावडी रस्त्याची जड वाहतुकीमुळे दुरवस्था झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जड वाहतुक व पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे तडे जावून ठिकठिकाणी खड्डे पडले असून, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संपत गाडे यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे, पावसामुळे साचलेले पाणी आणि चिखलामुळे वाहनचालकांना करावी लागणाऱ्या कसरतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून, परिसरातील रहिवाशांकडूनही रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सातत्याने तक्रारी तसेच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशीही मागणी होत असल्याचे गाडे यांनी सांगितले.
या मार्गालगत मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास असून, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच कामानिमित्त रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी खड्डे आणि चिखलामुळे अपघाताचा धोका वाढल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाने केवळ पाहणी न करता तातडीने प्रत्यक्ष काम हाती घ्यावे, अशी मागणी गाडे यांनी केली. पुणे महापालिकेसह संबंधित यंत्रणांनी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून पाणी साचणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, असेही त्यांनी नमूद केले.
प्रशासनाने नागरिकांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही गाडे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.