Sant Tukaram Palkhi sakal
पुणे

Sant Tukaram Palkhi : संत तुकोबारायांच्या पालखीचे चौफुला, वाखारी येथे स्वागत

दौंड तालुक्यातील चौफुला, वाखारी येथे भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

केडगाव : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर आहे. दौंड तालुक्यातील चौफुला, वाखारी येथे भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

पालखी सोहळा उरुळीकांचन येथे मुक्कामासाठी विसावला. वारकऱ्यांना सोमवारी (ता. १०) चौफुला-केडगाव ग्रामस्थांनी साबुदाणा वडा व मसाला दुधाचे वाटप केले. पालखीचे सकाळी साडेसहा वाजता चौफुल्यात आगमन झाले. त्यापूर्वी मयूर टेंगले यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत तर पद्‍मा बारवकर यांनी रांगोळी व फुलांच्या पायघड्या घातल्या.

मंडप व्यावसायिक शंकर ढमे, वर्षा अॅटो लाइनचे प्रमुख नारायण काळे, शांताई दूध डेअरीचे प्रमुख बाळासाहेब धायगुडे यांनी चौफुला चौकात वारकऱ्यांना साबुदाणा वडा, खिचडी, मसाला दूध यांची मेजवानी दिली. शंकर ढमे यांनी आरती यांनी आरती केल्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाला. वाखारी येथे सार्थक हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते पालखीला अभिषेक घालण्यात आला. चव्हाण यांनी पालखीला नाश्ता दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी असला तरी 'या' एका निर्णयामुळे पगारात होणार मोठी वाढ; आठव्या वेतन आयोगाचं सोपं गणित

SMAT 2026: वैभव सूर्यवंशीचा कर्णधार म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड! पण, संघ नाही जिंकला; वाचा बिहारचा कोणी करेक्ट कार्यक्रम केला

Gokul Dudh Dairy Kolhapur : गोकुळच्या पहिल्याच बैठकीत खुर्च्यांवरून शाब्दिक चकमक; बाबासाहेब चौगले, अंबरीश घाटगे, चेतन नरकेही म्हणाले आम्ही ५ वर्षे बसलोय...

Latest Marathi News Live Update: ६१ वर्षीय वृद्धाचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू

₹5000 farmer payment status : शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीमचे पाच हजार जमा; तीन लाखांहून अधिक जणांना मिळाला लाभ

SCROLL FOR NEXT