पुणे

देऊळगाव येथील बचत गट घेणार १०० किलो दराने भुंगेरे विकत

CD

केडगाव, ता २३ : देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथील शेतकऱ्यांनी प्रकाश सापळा लाऊन जमा केलेले हुमनीचे भुंगेरे जय हनुमान बचतगट १०० किलो दराने विकत घेणार आहे. या उपक्रमातून सामूहिक हुमनी निर्मूलन होणार असल्याने बचतगटाचे कौतुक होत आहे.
देऊळगाव गाडातील जय हनुमान बचत गटाचे अध्यक्ष राजवर्धन जगताप म्हणाले, नुकतीच पुर्वमोसमी पावसाला सुरुवात झालेली आहे. आता हुमनीचे प्रौढ भुंगेरे प्रजनन करिता बाहेर पडण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कडुलिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली अल्प खर्चाचा प्रकाश सापळा आजपासून लावावा. आणि हुमनीचे नियंत्रण करूया. एका प्रकाश सापळ्यात किमान १०० भुंगेरे अडकून पडतात. आणि एक मादी भुंगेरा ५० ते ६० अंडी घालून त्यातून किमान ५० हुमनीच्या आळी तयार होतात. असे १०० मादी भुंगेरे जर प्रकाश सापळ्यात पडून नष्ट झाले तर एका सापळ्यामुळे जवळपास पाच हजार हुमनीची आळी कमी खर्चात नियंत्रित होणार आहे.

याबाबत कृषी अधिकारी दिलीप यादव म्हणाले, दौंड तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. इतर गावातील बचतगटांनी अनुकरण करावे. प्रामुख्याने बाभळ किंवा कडुलिंबाच्या झाडावर रात्रीच्यावेळी भुंगेरा नर-मादीचे मिलन होते. त्यातून पुढे हुमनीची उत्पत्ती होते. मिलन काळात हुमनीचे कमी खर्चात व मोठ्या प्रमाणात नियंत्रण होते.

कसा करावा प्रकाश सापळा...
कडुलिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली एक बल्ब ( वीजेचा किंवा चार्जिंग बॅटरीचा ) लावून त्या खाली मोठ्या घमेल्यात किंवा सपाट वाफा बनवून पाणी सोडणे. या पाण्यात १ लिटर डिझेल मिसळणे. त्यात हुमनी भुंगेरे पडून मरतात.

03081

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT