पुणे

दौंडमधील महसूलचे प्रश्न तातडीने सोडवा : राधाकृष्ण विखे पाटील

CD

केडगाव, ता. २ : दौंड तालुक्यातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्याबाबत आमदार राहुल कुल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणी केली. मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीत ही मागणी केली. त्यावेळी मंत्री विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

आमदार कुल यांनी याबाबत दिलेल्या पत्रकात असे म्हटले की, दौंड तालुका नाट्यगृहासाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव लवकर मंजूर करावा, अधिकारी निवासस्थाने बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. याबाबत १५ दिवसांच्या आत जागा मागणीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा, असे आदेश अधिकाऱ्यांना विखे पाटील यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर आयोजित केलेल्या बैठकीत दौंड तालुका स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू केले असून त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व अधिकारी वाहनांची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘बैठक घेऊन मार्ग काढावा’
उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले आहे. उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी केली होती. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून जागेचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश दिले आहेत.
दौंड तालुक्यातील भांडगाव येथील पुणे-सोलापूर महामार्गाचे भूसंपादन चुकीच्या पद्धतीने झाले. याबाबत जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी बैठक घेऊन तातडीने मार्ग काढावा, असे विखे पाटील यांनी बैठकीत सुचविले आहे.

‘नुकसान भरपाईमध्ये वाढ करावी’
राज्यातील सार्वजनिक वीज वहन यंत्रणा जुनी झाल्याने तसेच विजेच्या उघड्या तारा, नादुरुस्त संयंत्रे आदींमुळे अनेक ठिकाणी विजेचा धक्का लागून जीवितहानी होत आहे. याबाबत शासनाने आवश्यक कार्यवाही करावी, या घटनांमध्ये देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये वाढ करावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी मंगळवारी ( ता.२) विधानसभेमध्ये केली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Mass Copy : बारावी निकालादरम्यान मोठी खळबळ! 250 हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई; गोंदिया-वर्ध्यातील 243 विद्यार्थी अनुत्तीर्ण, बोर्डाचा कठोर निर्णय

डॉक्टर 'डिलिव्हरी जिहाद' करतात, हिंदू महिलांचं सिझेरियन कसं? कालीचरण महाराजांचं पुन्हा वादग्रस्त विधान

शिवकालिन इतिसाहातील एक सुवर्ण पान! भव्य सेट, दमदार संवाद आणि अ‍ॅक्शन सीन; कसा आहे 'राजा शिवाजी'?

Crime: धक्कादायक! ८ मुलांची आई ५ मुलं असलेल्या जावयासोबत पळाली, पती म्हणतो- १२ वर्षाआधी पण त्यांनी...

अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे आवाहन; तज्ज्ञांचा नागरिकांना सावधगिरीचा इशारा

SCROLL FOR NEXT