पुणे

वाखारी येथील अपघातात लातूरमधील महिला ठार

CD

केडगाव, ता. ५ : पुणे- सोलापूर महामार्गावर वाखारी (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजता दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली. तर, त्यांचे पती गंभीर जखमी झाले.
सारिका शीलवंत गायकवाड (वय ४०) हे या अपघातात जागीच ठार झाल्या. तर, त्यांचे पती शीलवंत शांतकुमार गायकवाड (वय ४५, दोघेही रा. हातोसी, ता. निलंगा, जि. लातूर) हे गंभीर जखमी झाले.
हा अपघात वाखारी येथे ‘निर्माण हॉटेल’समोर झाला. एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात गायकवाड यांची मोटार दुभाजकाला धडकली. या धडकेत गायकवाड यांच्या मोटारीचा टायर फुटला आणि मोटार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन अन्य वाहनाला धडकली. अपघातात गायकवाड दांपत्य अडकले होते. स्थानिक रहिवाशांनी मोठे प्रयत्न करून त्यांना बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले. हॉटेलचे मालक दत्ता हंडाळ यांनी गायकवाड दांपत्यांना चौफुल्यातील पाटील रूग्णालयात दाखल केले. मात्र, सारिका यांचे उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शीलवंत गायकवाड यांना पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील रूग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, गायकवाड दांपत्य हे वंचित विकास आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे नातेवाईक आहेत. आंबेडकर यांनी डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधून उपचाराबाबत माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT