पुणे

केडगाव येथे पुतळ्याचे पूजन

CD

केडगाव, ता. २१ ः केडगाव ( ता.दौंड ) येथे शिवजन्मसोहळा समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आले होते. येथील शिवभक्तांनी पुरंदर किल्ल्यावरून शिवज्योत आणली. सकाळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ग्रामस्थांनी पूजन केले. यानंतर आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे सदस्य तुषार थोरात, अभिषेक थोरात, राहुल हंडाळ आदी मान्यवरांनी शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
दिवसभरात ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची केडगाव बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. मिरवणुकीची केडगाव पोलिस ठाण्यासमोर सांगता झाल्यानंतर शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिवजयंती सोहळ्यात रंगत आणली. सांस्कृतिक स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली.

04219

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai: वसईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार! नायगाव खाडीवर दुमजली पूल; वर मेट्रो, तर खालून वाहने धावणार

Ind vs SA T20 World Cup : दोन देशच नाही, तर दोन भाऊ आमनेसामने, मैदानाबरोबरच डगआऊटमध्ये रंगणार सामना

सोलापूर-धुळे मार्गावर भीषण अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू, टाटा नेक्सॉनचा चुराडा

Latest Marathi News Live Update : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

Immunity Boosting Superfoods: वारंवार थकवा आणि सर्दीचा त्रास होतोय? इम्युनिटी बूस्टसाठी खा ‘हे’ एनर्जी देणारे सुपरफुड

SCROLL FOR NEXT