केडगाव, ता. १६ : ‘‘सध्याची व भविष्यात मार्केटची स्पर्धा तीव्र होत आहे. दररोज नवनवीन बदल घडत आहेत. बाजारपेठेतील आव्हाने व संधी निर्माण होत आहे. व्यावसायिक जबाबदारी व कर्तव्य, आरोग्य विषयक जनजागृती आवश्यक आहे,’’ असे मत ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
देऊळगाव गाडा (ता.दौंड) येथील जलसंधारणाच्या व महिला सक्षमीकरणाच्या कामांना सुनंदा पवार यांनी भेटी देत बचतगटातील महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ डॉ. रतन जाधव, सरपंच राजवर्धन जगताप, माजी सरपंच विशाल बारवकर, लता रासकर, सुनीता सोनवणे, दादा शितोळे, बाळासाहेब शितोळे व बचत गटातील प्रमुख महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ मंत्रालयात कार्यरत असलेल्या सनदी अधिकारी रश्मी शितोळे यांचा सत्कार करण्यात आला.
देऊळगाव गाडा येथील मुख्यमंत्री समृद्ध अभियान योजनेअंतर्गत दौंड तालुक्यात प्रथम आलेल्या सद्गुरु विद्यालय भेट देऊन प्राचार्य महादेव कुदळे, त्यांचे शिक्षक सहकारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सरपंच राजवर्धन जगताप म्हणाले की, खोर, पडवी, देऊळगाव गाडा येथील महिलांना गेल्या चार वर्षापासून सुनंदा पवार मार्गदर्शन करत आहेत. ग्रामपंचायतला प्लॅस्टिक कचरा विकत देणाऱ्या महिलांना त्या मोबदल्यात झाडे लावण्यासाठी कुंड्या भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
---
04278