पुणे

कचरवाडीत नागरिकांकडून टँकरची मागणी

CD

निमगाव केतकी, ता. १० : निमगाव केतकी नजीक कचरवाडी गावामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शासनाने येथे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थ मागील एक महिन्यांपासून करत आहेत.
याबाबत मारुती कचरे म्हणाले, ‘‘गावच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसातून एकदा फक्त दहा मिनीट पाणी पुरवठा होतो. त्यामुळे माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. सध्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे शासनाने या ठिकाणी जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा.’’
माजी सरपंच नंदा लहू कचरे म्हणाल्या, ‘‘गावात व वाड्यावस्त्यांवर पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाने या ठिकाणी तातडीने टँकर सुरू करून पाण्यासाठी महिलांचे होणारे हाल थांबवावेत.’’ याबाबत सरपंच रामदास कचरे यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीने पंचायत समितीला टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिलेला आहे. याची दखल घेऊन टँकर सुरू करतील.


कचरवाडी (ता. इंदापूर) : गावास पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

SCROLL FOR NEXT