निमगाव केतकी, ता. १७ : निमगाव केतकी येथील रिगल फाउंडेशनच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती अभियान अंतर्गत स्वाक्षरी मोहीम राबवून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
रिगल फाउंडेशनचे प्रमुख राजू भोंग म्हणाले, ‘‘१६ वर्षांपासून रिगल फाउंडेशनच्या माध्यमातून मतदार नोंदणी आणि मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येते. त्याअंतर्गत वर्षभर नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती अशी मोहीम राबवली जाते. तर निवडणूक काळात मतदानाचा टक्का वाढवा, जास्तीत लोकांनी मतदानाचा हक्क बाजवावा यासाठी मतदार जागृती अभियान राबविण्यात येते. यात फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर एक हजारच्या आसपास लोकांची मतदार नोंदणी केली आहे.’’
यावेळी माणिक भोंग, बाळू बारवकर, संतोष गदादे, भूषण जौंजाळ, एम. बी. भोंग, ॲड. रोहित लोणकर, ॲड. संदीप शेंडे, ॲड. सुभाष भोंग, उमेश राऊत, तुषार खराडे, सागर ढगे, शंकर भोंग, महेश जठार, रामदास भोंग, संतोष भोंग, गोपाळ भोंग, आबा राऊत, चंद्रकांत शेंडे, महेश शिंदे, अवलेश डोंगरे उपस्थित होते. राजू भोंग,धनेश राऊत,अंबादास जगताप, ओंकार राऊत, तानाजी जगताप, रोहन भोंग, सौरभ डोंगरे, मनोज हेगडे, शिवा भोंग यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.