पुणे

कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेचे पुण्यामध्ये उद्या धरणे आंदोलन

CD

निमगाव केतकी, ता. १८: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह अन्य मागण्यांसाठी रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या बुधवारी (ता. १९) पुण्यामध्ये विभागीय आयुक्तालय, कौन्सिल हॉल येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन व आयुक्तालयास घेराव घालण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या विविध भागातून संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.पांडुरंग रायते यांनी दिली.
ॲड. रायते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज जयंती ते साहेबराव करपे कुटुंबीयांचे स्मृतिदिन १९ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीमध्ये संपूर्ण कर्जमुक्ती जागृती अभियान राज्यांमध्ये संघटनेच्या वतीने राबविण्यात आले.

यावेळी सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांची कर्जातून मुक्तता करा, दुधासह सर्व शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, शेती पंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळाली पाहिजे, उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्या नाहीतर दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द करा, वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा. या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले हे मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT