पुणे

निमगाव केतकीकरांकडून वारकऱ्यांची सेवा

CD

निमगाव केतकी, ता. २८ : सणसर (ता. इंदापूर) येथून पहाटे निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करत तब्बल २४ किलोमीटर अंतराचा मोठा टप्पा पार करत शनिवारी (ता. २८) सायंकाळी साडेआठ वाजता नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे मुक्कामासाठी विसावला.
पालखी सोहळा सवंदडीच्या माळावर आल्यानंतर गावातील भजनी मंडळासह ग्रामस्थांच्यावतीने सरपंच प्रवीण डोंगरे, तात्यासाहेब वडापुरे, दादासाहेब शेंडे, सचिन जाधव, अमोल हेगडे, संतोष घनवट, मच्छिंद्र आदलिंग, बाबासाहेब भोंग, सोमनाथ आदलिंग, महादेव पाटील, धनंजय राऊत, सुरेश गुरव, मंगेश घाडगे, नारायण राऊत, संतोष भागवत व मान्यवरांनी पालखीचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले.
ग्रामस्थांनी विविध उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सेवा व सुविधा दिल्या. गावकरी मंडळींनी बाजार पटांगणावरती, सुवर्णयुग पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष दशरथ डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, अष्टविनायक पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष देवराज जाधव व त्यांच्या सहकार्याने, सुवर्णयुगेश्वर पतसंस्था व सुवर्णयुग ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, केतकेश्वर पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष गोरख आदलिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी, जनहित पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष अस्लम मुलाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी, कै. सोपानराव भोंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संदीप भोंग, रणजित भोंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी जय भवानी महिला पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष अनुराधा हिंगाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, इंदापूर शिक्षक समिती, गुरुसेवा बचत गट या सर्वांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान, सरबत, दूध व पाणी वाटप केले. मुस्लीम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुख्तार मुलाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरखुर्मा वाटप केले. अनेक पान उत्पादक शेतकऱ्यांनी विड्यांच्या पानाचे वाटप केले.
ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. चंद्रकांत पाटील व समर्थ युवा फाउंडेशन व जानाईलक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दादाराम शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भूषण सुर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट व गणेश पतसंस्था यांच्यावतीने अध्यक्ष किशोर पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या वतीने वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा पुरविली.
दरम्यान, वाटेत शेळगाव फाटा येथे सरपंच ऊर्मिला शिंगाडे, ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे, छत्रपती कारखान्याचे संचालक विठ्ठल शिंगाडे, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. गोतोंडी येथे सरपंच मनिषा पोपट नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, गुरुनाथ नलवडे, अप्पा मारकड, काशिनाथ शेटे व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ; नाशिककरांना सतर्कतेचा इशारा

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT