पुणे

महादेव जानकर यांची पान बाजारास भेट

CD

निमगाव केतकी, ता.१३: येथील पान बाजारात नुकतीच माजी पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री, विधान परिषदेचे आमदार महादेव जानकर यांनी भेट दिली. त्यांनी यावेळी पानमळे धारक, व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधला. सध्या विड्याच्या पानाचे दर पडले असल्याने पान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याने यावर मार्ग काढावा, अशी विनंती त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दूरध्वनी वरून केली. यावेळी कोकाटेने देखील लवकरच आपण यावर मार्ग काढू असे आश्वासित केले.
पान बाजारात पान उत्पादक गोरख आदलिंग, ब्रह्मदेव शेंडे यांनी सांगितले की, राज्यात नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी येथील पान उत्पादक शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने तो सध्या खूप अडचणीत सापडलेला आहे.
यावेळी गोरख आदलिंग, ब्रह्मदेव शेंडे, कांतिलाल राऊत, ॲड. सचिन राऊत, संतोष हेगडे, अण्णा पाटील, विराज पाटील, विशाल जगताप, राहुल बरळ, गणेश पवार, बापू खराडे यांच्यासह पान उत्पादक शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Update : दिवसभरात देशविदेशात काय काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT