पुणे

चुकून खात्यात आलेले पैसे शिक्षक राऊत यांनी केले परत

CD

निमगाव केतकी, ता. २६: निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील शिक्षक उमेश लालासाहेब राऊत यांच्या बॅंक खात्यात जमा झालेले अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने आलेले ९० हजार रुपये त्यांनी मुळ मालकाचा शोध घेत त्यांना परत करत प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले. याबद्दल शिक्षक राऊत याचे संपूर्ण गावात कौतुक केले जात आहे.
गुरुवारी (ता. २४) राऊत यांच्या बॅंक खात्यात अचानक ९० हजार रुपये जमा झाले होते. हे पैसे नेमके कोणी पाठवले हे राऊत यांच्या लक्षात येत नव्हते. शेवटी ज्याने हे पैसे नजरचुकीने पाठवले होते. त्या नूर हसन शेख (डाळिंबाचे व्यापारी, उत्तरप्रदेश) या व्यक्तीचा राऊत यांना फोन आला. त्यांनी राऊत यांना सराफवाडी येथील शेतकऱ्याचे डाळिंबाचे पैसे त्यांना पाठवत असताना संपर्क क्रमांकातील एक आकडा चुकीचा दाबल्यामुळे ते पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याचे सांगितले.
व्यापारी शेख सध्या याच पासिरात डाळिंब खरेदीसाठी आलेले असल्याने ते व शेतकरी जाधव यांनी राऊत यांची भेट घेतली. या वेळी राऊत यांनी सदर खात्याची पडताळणी करून शेख यांचे बॅंक खात्याचे तपशील घेऊन प्रामाणिकपणे त्यांच्या खात्यात सर्व पैसे जमा केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...

AI क्रांतीचा फटका! कामगिरी नव्हे, कौशल्य हवे! TCS ने बदलली खेळी, 12 हजार कर्मचाऱ्यांची करणार कपात

SCROLL FOR NEXT