निमगाव केतकी, ता.१४: पोंदकुलवाडी (ता. इंदापूर) येथे एक दिवसीय जनावरांचे आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवणचे प्रभारी अधिकारी उमेश निकम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात शेतकऱ्यांना जनावरांच्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवणतर्फे आयोजित शिबिरात कर्मयोगी सहकारी कारखान्याचे संचालक छगन भोंगळे, बँक ऑफ महाराष्ट्राचे भिगवण ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहाय्यक देवा फलफले, डॉ. मयूर बोराटे आदी उपस्थित होते.
यावेळी फलफले म्हणाले की, महाबँक ग्रामीण विकास केंद्रामध्ये शेतकऱ्यांना विविध विषयांवर मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येते. दुग्धजन्य पदार्थ निर्मिती या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भिगवण येथे घेण्यात आले. यामध्ये सहभागी होण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोणत्याही शाखेमध्ये नाव नोंदणी करून सहभागी होता येईल तरी ग्रामीण भागातील युवा शेतकरी अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
संतोष भोंगळे यांनी प्रास्ताविक तर अशोक भोंगळे यांनी आभार मानले.
02850