पुणे

शेळगाव पाटी येथील अपघातात युवक ठार

CD

निमगाव केतकी, ता. १० : शेळगाव पाटी (ता. इंदापूर) येथे शिरसटवाडी हद्दीत उड्डाणपुलावर टेम्पो व सुप्रो मॅक्सी चारचाकी गाडीचा शुक्रवारी (ता. १०) झालेल्या अपघातात हगारेवाडी (ता. इंदापूर) येथील प्रतीक विशाल हगारे (वय २०) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवारी सकाळी शेळगाव पाटी येथे शिरसटवाडी गावच्या हद्दीत पुलावरून बारामती बाजूकडून इंदापूरकडे येत असताना हगारे यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचे सुप्रो मॅक्सी (क्र. एमएच ४२ बीएफ ८८९७) हे वाहन हयगयीने, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालवून समोरून येणाऱ्या अशोक लेलैंड कंपनीचा टेम्पोला (क्र. एमएच १६ सीडी ८०००) समोरील बाजूस जोरात धडक दिली. यामध्ये प्रतीक याच्या डोक्याला, पोटाला, पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून, पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत सचिन रामहरी हगारे यांनी फिर्याद दिली. प्रतीकच्या मागे आई वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादासाहेब डोईफोडे करीत आहेत.

02968

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG New Rule: मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये झाले बदल

Mumbai Bakari Eid Market : गेल्या काही दशकांतील सर्वात महागडी ईद! बोकडांच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; पाहा देवनारमधील सद्यस्थिती

'टायटन'ची कथा 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! नसिरुद्दीन शाह साकारणार JRD Tata

IND vs AFG: भारताला टक्कर देण्यासाठी अफगाणिस्तानने जाहीर केले तगडे संघ; राशिद खान खेळणार की नाही? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हायटेक होणार! मंदिरात उभारला जाणार भव्य कॉरिडॉर; भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार

SCROLL FOR NEXT