पुणे

निमगाव केतकीतील पशुचिकित्सालय धोकेदाय

CD

मनोहर चांदणे : सकाळ वृत्तसेवा
निमगाव केतकी, ता.१९ : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या इमारतीची अवस्था दयनीय झालेली आहे. केवळ ३९१ चौरस फूट आकाराची छोटीशी इमारत धोकेदाय स्थितीत आहे. फरशी उचकटलेली आहे. खिडक्या व दरवाजे खराब झालेले आहे. मोडखळीस आल्याने ती धोका बनली आहे.

पशुवैद्यकीय दवाखान्याची पावसाळ्यात इमारतीचे छत गळते. भिंतीना भेगा पडलेल्या आहेत. छताचा स्लॅब तीन ठिकाणी आतून पडलेला आहे. अशाही स्थितीत डॉ. अशोक काळेल हे पशुधन पर्यवेक्षक म्हणून काम पाहतात. दत्तात्रेय भोंग हे परिचर म्हणून कार्यरत आहेत. येथील पशुधन विकास अधिकारी हे मंजूर असलेले पद अद्याप रिक्तच आहे. या दवाखान्याच्या अंतर्गत निमगाव केतकी, कचरवाडी, कौठळी, पिटकेश्वर व व्याहळी ही पाच गावे येतात.

पशुधन
शेळी........ १५,५५६
गायवर्ग ........ ६५१८
मेंढी ........ ३४६७
म्हैसवर्ग ........ २४७३

लसीकरण
लाळ्या खुरकूत..........७१५३
लंपी..........६१६५
लहान शस्त्रक्रिया..........१५
गर्भ तपासणी..........५४१


एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ स्थिती
कृत्रिम रेतन संख्या..........५०९
व्यंधत्व निर्मूलन संख्या..........४२०

सध्याची इमारत अनेक दिवसापासून धोकेदायक झालेली आहे. नवीन जागा व इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. तो मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध होतील. यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ.अशोक काळेल, पशुधन पर्यवेक्षक, निमगाव केतकी.

KET25B03068

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariffs on India : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची तयारी, यावेळी नेमकं कारण काय ?

Karad RTO Scam:संशयितांच्या हाती पुन्हा ‘आरटीओ’चा कारभार;कऱ्हाडमध्ये अधिकाऱ्यांच्या कामातही हस्तक्षेप, बनावट पावत्या अन्..

Beed Heavy Dust Creating Problems for Commuters: गेवराई–जातेगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; वर्षभरापासून रुंदीकरणाचे काम रखडले

Pimpaloshi Soldier Martyred: पिंपळोशीचे जवान निकम हुतात्मा; कुटुंबीयांचा आक्राेश, सिक्कीम व पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर काय घडलं!

मोठी बातमी! बारावीचे प्रवेश यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; खासगी शाळांना आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देताच येणार नाहीत

SCROLL FOR NEXT