पुणे

परिस्थितीवर मात करत अभिजित बनला असिस्टंट प्रोफेसर

CD

निमगाव केतकी, ता. २४ : गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करणारे वडील व शेतमजुरी करणारी आई यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवत निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्ती ते अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियापर्यंतचा शिक्षण प्रवास अभिजित घनवट या युवकाने पूर्ण केला. आता तो नुकताच केरळ येथील तिरुअनंतपुरममधील केंद्र सरकारच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाला आहे. शिक्षणाच्या आड आर्थिक परिस्थिती येत नाही हे दाखवून देणाऱ्या अभिजितच्या या यशाचे ग्रामस्थांसह विविध स्तरातून कौतुक होत आहे.
अभिजितचे वडील आत्माराम घनवट यांनी गवंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून पंचवीस वर्षे काम तर आई लता यांनी शेतमजुरी करत मुलांना शिक्षण दिले. मुलीचे शिक्षण व लग्न केले. नंतर मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट केले व मुलाने देखिल त्यांच्या कष्टाचे सोनं केले.
अभिजितचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्ती, पाचवी ते दहावीपर्यंत श्री केतकेश्वर विद्यालय, अकरावी बारावी ना. रा. हायस्कूल इंदापूर, बीएससी टी. सी. कॉलेज बारामती, गणितामध्ये एमएससी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, पीएचडी चेन्नईत केली. पीएचडीनंतर मुंबई, मद्रास व अमेरिकेतील जॉर्जिया येथे संशोधनाचा (रिसर्च स्कॉलर)अनुभव घेतला. उच्च शिक्षण सर्व शासनाच्या शिष्यवृत्तीतून पूर्ण झाले.

मला दहावीला फक्त ६४ व बारावीला ५३ टक्के मार्क होती. आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवले आणि स्वतःला झोकून देत खूप मेहनत घेतली. कॉलेजपासून अमेरिकेपर्यंतचा खर्च वेगवेगळ्या शिष्यवृत्तीतून झाला. ध्येय निश्चित केले व स्वतः तयारी ठेवली तर सरकार देखिल शिक्षणाला कमी पडू देत नाही हे मुलांनी अभ्यासले पाहिजे. घेतलेल्या कष्टाला चांगले यश मिळाले याचा मोठा आनंद आहे.
-अभिजित घनवट, असिस्टंट प्रोफेसर.

लय गरिबीतनं आम्ही नवरा बायकोनं अभिजितला शिकवलं. आमच्या कष्टाच चीज त्यान केलं. आम्हाला त्याचा लय अभिमान वाटतो.
-आत्माराम घनवट, वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT