पुणे

कडबा खरेदीला येण्याच्या निमगावकरांना आठवणी

CD

निमगाव केतकी, ता. २८ : राजकारणात येण्यापूर्वी मी निमगाव केतकीच्या शनिवारच्या आठवडे बाजारात कडबा खरेदी करण्यासाठी येत होतो, अशी आठवण निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे झालेल्या प्रत्येक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आवर्जून करत व माझा आणि निमगाव केतकीकरांचा किती जुना ऋणानुबंध आहे, याची ते भाषणामध्ये आवर्जून आठवण करून देत असत.
बुधवारी सकाळी अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर ग्रामस्थांनी दादांच्या या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला. अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी सकाळी वाऱ्यासारखी निमगाव पंचक्रोशीत पसरली. याचा धक्का सर्वांनाच बसला. ग्रामस्थांसह दुकानदार व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सर्व दुकाने व्यवहार बंद ठेवत दादांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री केतकेश्वर विद्यालयाला सुट्टी देण्यात आली. पंचक्रोशीतील वरकुटे खुर्द, गोतंडी, सराफवाडी, पिटकेश्वर, शेळगाव येथील सर्व व्यवहार दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आले. अजितदादांनी प्रत्येक गावाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे विकास निधी दिल्याच्या आठवणी ग्रामस्थ सांगत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT