निमगाव केतकी, ता. २१: सायंकाळी ६ ते १० या वेळेतील भारनियमनामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांचे हाल होत असून, ही वेळ बदलून दुपारी करण्याची मागणी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील ग्रामस्थांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. येथील ग्रामदैवताची यात्रा आणि विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असतानाच वाड्या-वस्त्यांवर सायंकाळी वीज खंडित केली जात आहे. यामुळे अभ्यासात व्यत्यय येत असून, महिलांचीही गैरसोय होत आहे. या प्रश्नी ॲड. सचिन राऊत, कपिल हेगडे, ॲड. सुभाष भोंग यांच्यासह ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता टी. एन. बेरूळे यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वेळ बदलण्याची मागणी केली. दरम्यान, वेळापत्रकात बदल करण्याचा अधिकार वरिष्ठांना असल्याचे बेरूळे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.