पुणे

कुस्ती निवेदनातून मर्दानी खेळाचा प्रचार

CD

निमगाव केतकी, ता. २९ : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यात्रांमधील कुस्ती मैदानांना धावत्या निवेदनाची जोड देऊन हा मर्दानी खेळ घराघरांत पोहोचवण्याचे काम युवा निवेदक प्रभावीपणे करत आहेत. ज्येष्ठ निवेदक शंकर अण्णा पुजारी यांच्या तालमीत तयार झालेले प्रशांत भागवत, प्रवीण ठवरे, सुभाष दिवसे आणि अक्षय मुळूक हे युवक कुस्तीचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.
पूर्वी कुस्ती मैदानांत केवळ पहिलवानांची नावे पुकारली जात. मात्र, कै. बापूसाहेब राडे यांनी सुरू केलेली निवेदनाची परंपरा शंकर अण्णा पुजारी यांनी ३५ वर्षे जोपासली. पुजारी यांनी वयोमानानुसार निवृत्ती घेतली असली, तरी त्यांनी घडवलेले २५ ते ३० निवेदक आज राज्यभर कुस्तीचा प्रचार करत आहेत.
घरात एखादा तरी पहिलवान तयार करा, उघड्या तिजोऱ्या (पैलवान) घडवा, हा पुजारी अण्णांचा संदेश आजही आखाड्यात घुमत आहे. बारामतीचे निवेदक प्रशांत भागवत म्हणाले, ‘‘गेल्या २३ वर्षांपासून आम्ही निवेदनातून कुस्तीचा इतिहास, पहिलवानांचा परिचय आणि गावाची संस्कृती मांडत आहोत. यामुळे कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतही वाढ झाली आहे.’’

03237

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT