पुणे

भोर, मुळशीत गावरान पावट्याचा हंगाम बहरला

CD

खेड शिवापूर, ता. ३ : हवेली, भोर, पुरंदर आणि मुळशी तालुक्यात गावरान पावट्याची शेती बहरली आहे. इतर पावट्याच्या तुलनेत हा पावटा चवीला अधिक चांगला असतो. त्यामुळे पुण्याबरोबरच कोकण बाजारपेठेतही त्याला चांगली मागणी आहे. पावट्याचे उत्पादन अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्यास मदत होते.


पुण्यातील बाजारात हायब्रीड पावटा बाजारात बारा महिने उपलब्ध असतो. मात्र, या गावरान पावट्याचा विशेष हंगाम असतो. साधारणतः: जुलै महिन्यात गावरान पावट्याची लागवड केली जाते. तर दिवाळी नंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस या गावरान पावट्याला शेंगा येतात. शेंगांचा हा हंगाम एप्रिल ते मे महिन्यापर्यंत म्हणजेच पाच ते सहा महिने सुरू राहतो. बाजारात होणारी आवक पाहून या पावट्याचा बाजारभाव ठरतो.

दररोजच्या आहारात प्रमाण जास्त
या गावरान पावट्याच्या शेंगांच्या ओल्या दाण्याची पातळ आणि सुकी भाजी व पावट्याचे दाणे टाकून केलेला पावटा भात विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे या पावट्याच्या हंगामात या भागातील नागरिकांच्या दररोजच्या आहारात पावट्याची भाजी आणि पावटा भात या पदार्थांचे प्रमाण जास्त असते.


हायब्रीड पावट्याच्या तुलनेत गावरान पावटा चवीला अधिक चांगला आणि त्याला विशेष चमक असते. चवीला चांगला असल्याने पुण्याच्या तसेच कोकणच्या बाजारपेठेत या गावरान पावट्याला चांगली मागणी असते. त्यामुळे आम्ही दरवर्षी या गावरान पावट्याचे उत्पादन घेतो.
- गणेश गोगावले, पावटा उत्पादक

01213, 01214

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT