खेड शिवापूर, ता. ३१ : पुणे- सातारा रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरात सुमारे तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. तसेच, १ एप्रिलपासून टोल नाक्यावर रोखीचे व्यवहार बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे- सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी दिली. दरवर्षी १ एप्रिलला टोलच्या दरात बदल होतात. यावर्षीही १ एप्रिलपासून टोलचे दर बदलण्यात आले आहेत.
वाहन प्रकार जुने टोल दर नवीन टोल दर
कार जीप १२५ १२५
हलके वाहन २०० २०५
दोन ॲक्सल बस/ट्रक ४१५ ४२५
तीन ते सहा ॲक्सल वाहने ६५५ ६६५
अवजड वाहने ७९० ८१०
खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरात गतवर्षीपेक्षा सुमारे तीन टक्के वाढ केली आहे. स्थानिक नागरिकांनी गैर व्यावसायिक वाहनांसाठी सवलतीच्या दरातील मासिक पास घ्यावा. तसेच, टोलनाक्यावर १ एप्रिलपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही.
-अमित भाटीया, पुणे- सातारा टोल रोड व्यवस्थापक
टोलनाके होणार ‘कॅशलेस’
टोलबाबतचे सर्व व्यवहार हे फास्टॅग, तसेच डिजिटल पद्धतीने करण्यात यावेत. टोलवर रोखीचे व्यवहार करण्यात येऊ नयेत. टोल नाक्यावर रोखीचे व्यवहार थांबविण्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून संबंधित टोल व्यवस्थापनाला करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.