पुणे

मतदार याद्या अद्ययावतसाठी नागरिकांना आवाहन

CD

देहूरोड, ता. २८ : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत नागरिकांना मतदार यादी अचूक व त्रुटीरहित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘मतदार राजा जागा हो, आपल्या मताधिकाराचे संरक्षण करा,’ असा संदेश देत भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. भविष्यात मतदार यादीवर येणारे संभाव्य आक्षेप कमी व्हावेत आणि यादी अधिक अचूक व्हावी, यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी काय करावे?
नागरिकांनी voter.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘Search Your Name in Last SIR’ या पर्यायावर जाऊन आपले नाव तपासावे. नाव आढळल्यास मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, यादीतील अनुक्रमांक ही माहिती घेऊन संबंधित भागातील बीएलओ (मतदार केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्याशी संपर्क साधून सध्याचे नाव २००२ मधील नोंदीशी पडताळून घ्यावे. जर २००२ च्या यादीत नाव नसेल, तर आई-वडील किंवा आजी-आजोबा यांची माहिती बीएलओकडे त्वरीत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी असून, सर्वांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन तलाठी कविता मोहमारे यांनी केले आहे.
---

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

Latest Marathi News Live Update : आठ जुलैला होणार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान

Tipu Sultan Heirs : टिपू सुलतानचे वंशज चक्क चालवतात रिक्षा, सोन्या चांदीत लोळणारे राजघराणे एक-एक रुपयाला झालेत लाचार, आता कुठे आहेत

अनफेअर एव्हिक्शन ! बिग बॉस मराठीला संकेत पाठकचा अलविदा; चाहते संतापले "स्क्रिप्टेड शो.."

SCROLL FOR NEXT