पुणे

कामतवाडी येथील शाळेला प्रिंटर भेट

CD

कोळवण, ता.२१ : भालगुडी (ता. मुळशी) या परिसरातील कामतवाडी येथील जिल्हा प्राथमिक शाळेला भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायतीने प्रिंटर भेट दिले.

शाळेत ‘‘मेरी मिट्टी मेरा देश’’ अभियान राबवून रविवार (ता. १३) ते मंगळवार (ता. १५) ऑगस्ट या तीनही दिवशी ध्वजवंदन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे व समूहगीते घेतली. शिक्षक परसराम झोजे यांनी शाळेत चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

सुनील साठे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप, उद्योजक समीर पिंपळे यांनी शाळेला एक टेबल व मुलांसाठी शैक्षणिक, सागर अशोक साठे यांनी शाळेला डिजिटल वजन काटा, तसेच सागर गोविंद साठे यांनी शाळेला तीन खुर्च्या भेट दिल्या. त्यानंतर निपुण भारत अंतर्गत प्रिया साठे व जिजा साठे या लीडर मातांचा सन्मान केला.

यावेळी सरपंच रामदास झुकाजी साठे, उपसरपंच वनिता साठे, ग्रामपंचायत सदस्य संतोष साठे, स्नेहल साठे, लक्ष्मी साठे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास किसन साठे, पोलिस पाटील अनंता साठे, ग्रामसेवक गजानन जाधव, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कैलास साठे, अशोक साठे, अंकुश साठे, राजेंद्र साठे, सहादू साठे, अंकुश साठे, सोमनाथ महाराज साठे, राम साठे, निवृत्ती केंडे, लहू साठे, राम साठे, संदीप साठे, शंकर साठे, बाळू साठे, संजय साठे, सदाशिव साठे आदी उपस्थित होते. पदवीधर शिक्षक परसराम झोजे यांनी सूत्रसंचालन, मुख्याध्यापिका श्रीमती उषा दाभाडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT