पुणे

भरेमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

CD

कोळवण, ता. २१ ः मुळशी तालुक्यातील भरे येथील महावितरणचे उपअभियंता यांच्या कार्यालयात सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठा सुरळीत होण्याबाबत निवेदन दिले.

या निवेदनातील मागणीनुसार तालुक्यातील कोळवण खोरे, रिहे खोरे, भादस खोरे, माले खोरे, मुठा खोरे, पूर्वेकडील भुकूम, भूगाव, पिरंगुट, हिंजवडी, माण भागातून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याबाबत मनसेकडे तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण मुळशीतील पदाधिकाऱ्यांनी महावितरणकडे निवेदन दिले. पावसाळ्यात काही दुर्गम भागात दोन-दोन दिवस वीज गायब असते. याची दखल घेतली जावी. वरील सर्व मागण्यांची दखल येत्या आठ दिवसांत घ्यावी, अन्यथा महावितरणच्या भरे येथील कार्यालयात आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण मुळशीचे अध्यक्ष धनंजय टेमघरे, उपाध्यक्ष गणेश शिंदे, संघटक सोमनाथ कवडे, माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय देवकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन प्राप्त झाले असून यातील मागण्यांवर आम्ही या अगोदरच काम सुरू केले आहे. तालुक्यातील विजेबाबतची पावसाळ्यापूर्वीची पूर्ण करावयाची कामे आम्ही हाती घेतली आहेत.
- आनंद घुले, उपअभियंता, महावितरण, मुळशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT