पुणे

साठेसाईच्या सुपुत्राच्या चित्रांचे प्रदर्शन ११ जूनपासून

CD

कोळवण, ता. ८ : साठेसाई (ता. मुळशी) गावचा सुपुत्र सुप्रसिद्ध चित्रकार विश्वनाथ खिलारी यांच्या चित्रांचे प्रदर्शन पी. एन. गाडगीळ अँन्ड सन्स, हॅप्पी कॉलनी, कोथरूड येथील कलादालनात येत्या मंगळवारपासून (ता. ११) ते (ता. १६) जून पर्यंत सकाळी अकरा ते सायं. साडेसात वाजेपर्यंत सर्वांना विनामूल्य पाहता येईल.
यामध्ये निसर्गाचा सुंदर आविष्कार आपणास पहावयास मिळणार असून गावाकडील सुंदर पहाट, सकाळची कोवळी किरणे आणि झाडं पानाफुलांचे सुंदर रेखाटन या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.
‘मयूर’ नावाने भरणारे हे प्रदर्शन मोरांच्या अनोख्या दुनियेमध्ये आपल्याला घेऊन जाणार असून ही चित्र तयार करताना जलरंग, ॲक्रेलिक कलर यांचा पेपर व कॅनव्हास वर सुंदर वापर केलेला आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन मंगळवारी सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ चित्रकार प्रा. मिलिंद फडके आणि लेखक व इतिहास संशोधक अनिकेत यादव यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनाला संस्कार भारतीचे प्रफुल्ल भिष्णुरकर, लीना आढाव, रमेश खडबडे, संतोष देवे, धीरज दीक्षित आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी हे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी चित्रप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन चित्रकार विश्वनाथ खिलारी यांनी केले आहे. विश्वनाथ यांनी काढलेले विठ्ठलाचे सुप्रसिद्ध चित्र मागील काही वर्षांपासून आषाढी वारीकाळात तर संपूर्ण वृत्त वाहिन्यांवर तसेच जवळपास सर्व वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dausa Case: अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार..अचानक झाली प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

Sonia Gandhi : सोनिया गांधींची इंस्टाग्रामवर इंट्री, ३ तासांत ५९ हजार लाईक्स अन् १३ हजार फॉलोवर्स; नव्या सुरुवातीची राजकीय वर्तुळात चर्चा

Latest Marathi News Live Update : ऑडियो क्लिपमधून एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न- उदय सामंत

मुलांना 'नीट बोल' म्हणून टोकताय? 'या' दबावामुळे वाढते तोतरेपणाची भीती; शाळेत १०० पैकी ५ मुलांमध्ये दिसतात 'ही' लक्षणे...

Kolhapur Gokul Election: कोरेंच्या बालेकिल्ल्यालाच ‘समविचारी’चे खिंडार; महायुतीला कमी मते; पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगलेत पिछाडीवर

SCROLL FOR NEXT