कोळवण, ता. १० : साठेसाई (ता. मुळशी) येथील तुकारामनगरमध्ये संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी (३७५) वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराम महाराज चरित्र कथेचे आयोजन ग्रामस्थांनी बुधवार (ता. १२) ते रविवार (ता. १६) केले आहे. यामध्ये सकाळी ११ ते १ गाथा भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,सायंकाळी ७ ते ९ श्री संत तुकाराम महाराज चरित्र कथा रात्री ९ नंतर महाप्रसाद भोजन असे दैनंदिन कार्यक्रम असणार आहेत. ओंकार महाराज दुडे शास्त्री हे तुकाराम महाराज चरित्र कथा ऐकविणार आहेत. त्यांना साथ संगत सोमनाथ महाराज साठे, सागर महाराज बधे, गुरुकृपा गुरुकुलचे संस्थापक वैभव महाराज दुडे, गौरवजी महाराज काकडे, विकास महाराज भुसारे हे करणार आहेत. रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे व तुकाराम महाराज वैकुंठ गमनपर (तुकाराम बीजेचे) कीर्तन भागवत महाराज साळुंके यांचे होईल व त्यानंतर महाप्रसाद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.