पुणे

नांदगाव येथे रस्त्यावर मोठे भगदाड

CD

कोळवण, ता. १८ : पौड-कोळवण (ता. मुळशी) रस्त्यावर प्र. जि. मा. २६ वर नांदगाव येथील माऊली मंगल कार्यालयाच्या शेजारी मोठे भगदाड पडले आहे. अतिशय वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने एखाद्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर असा एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करत आहेत,
या खड्ड्याचे आसपासच्या भागातील रस्ता खचला असून वरून रस्त्याचे डांबरीकरण केलेले आवरण फक्त शिल्लक आहे व रस्त्याचे खाली पोकळ जमीन नजरेने स्पष्ट दिसत आहे.
पौड कोळवण काशिग रस्ता हा साधारण दोन वर्षांपूर्वी सुमारे नऊ कोटी रूपये खर्च करून तयार केला आहे. अवघ्या दोनच वर्षांत जर या रस्त्यावर असे खड्डे पडले तर यावरूनच कल्पना येते की या रस्त्याचे काम कसे झाले असेल, हा संशोधनाचा विषय असेल. बांधकाम विभागास या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची कल्पना तरी आहे का? हा खड्डा लांबून दिसत नाही तर रात्रीच्यावेळी या खड्ड्यात वाहन अडकून अपघात झाला व एखाद्या निष्पापाचा त्यात बळी गेल्यानंतरच बांधकाम विभाग जागे होणार आहे का?
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या खड्ड्याची पाहणी होऊन त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या खड्ड्याचे बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेत साळुंखे यांना संपर्क करून विचारले असता त्यांनी सांगितले की, खड्ड्याची पाहणी करून लवकरच त्यामध्ये भराव टाकून खड्डा भरून घेण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT