पांडुरंग साठे : सकाळ वृत्तसेवा
कोळवण, ता. २७ : कुळे येथील पशुचिकित्सालयास झाडाझुडपांचा विळखा पडला आहे. इमारती भोवती मोठ्याप्रमाणात गवत वाढले आहे. इमारतीच्या दरवाज्यासह खिडक्याही तुटल्याही आहेत. छत गळतीमुळे पावसाळ्यात दवाखान्याची मोठी दुरवस्था होते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वीज व पाणी उपलब्ध नाही. शौचालयाचीही अवस्था दयनीय आहे. त्यामुळे नवीन सुसज्ज इमारत उभारावी, अशी मागणी पशुपालकांकडून जोर धरत आहे.
पशुवैद्यकीय दवाखाना आठ वर्षांपासून डॉक्टर अभावी बंद होता. त्यामुळे गावात पशुवैद्यकीय दवाखाना आहे हेच कुळे गावातील ग्रामस्थ विसरले आहेत. येथील पशुपालक आर्थिक भुर्दंड सोसून खासगी डॉक्टरांकडून पशुधनांवर उपचार करून घेत आहेत. मात्र, आता मागील काही महिन्यांपासून येथे पशुवैद्यकीय विकास अधिकारी डॉ. अंजली दळवी व पशुवैद्यकीय पर्यवेक्षक म्हणून कोळवण पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. जगन्नाथ पाटील हे काम पाहत आहेत.
दवाखान्यांतर्गत येणारी गावे
कुळे
नांदगाव
चिखलगाव
दखणे
नाणेगाव
चाले
सावरगाव
यांची आहे गरज
- नवीन सुसज्ज इमारत
- पशुंच्या तपासणीसाठी आधुनिक यंत्रणा
- वीज, पाणी, शौचालय, सुरक्षा रक्षक
- औषधोपचारासाठी आवश्यक फर्निचर
- आरोग्य कर्मचारी यांना निवासस्थाने
परिसरातील पशुधन
म्हैस....... १२२७
गाई....... ८८५
शेळ्या....... ३८
मेंढ्या....... ०
एप्रिल ते ऑक्टोबरमधील स्थिती
एकूण उपचार..........८५०
इतर उपचार..........४८०
कृत्रिम रेतन संख्या..........२३१
गर्भधारणा तपासणी..........१८०
वंध्यत्व निर्मूलन..........७८
खच्चीकरण..........२२
प्रमुख रोग
लंपी
ताप
मस्टायटिस (कासेचा दाह)
लसीकरण
लाळ्या खुरकूत..........२११२
लंपी..........१०००
घटसर्प..........१०००,
पीपीआर..........१००
फऱ्या..........१००
रिक्त पदे
पशुधन विकास अधिकारी
पशुधन पर्यवेक्षक
पशुधन परिचर
दृष्टीक्षेपात दवाखाना
- वासरांच्या जन्म नोंदी
- दर बुधवारी रुग्णवाहिका घेऊन फिरता पशुवैद्यकीय दवाखाना
- रक्त लघवी तपासणी सुविधा उपलब्ध नाही
- पशुपालकांसाठी प्रशिक्षण सत्रांचा अभाव
- शासकीय योजनांद्वारे शेळ्या मेंढ्या कोंबड्या बोकडांची उपलब्धता
- गाई म्हैशींसाठी ऑनलाइन अर्ज
- मका ज्वारी बियाणांसाठी ५० जणांनी ऑनलाइन अर्ज
जिल्हा परिषद योजनांपासून पशुपालक दूर
कुळेतील दवाखाना राज्य सरकारचे अखत्यारीतील असल्याने पशुपालकांना जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ मिळत नाही. यामध्ये जनावरांना बसण्यासाठी मॅट, धार काढणी यंत्र, कॅन, बादली, घमेले यापासून पशुपालक वंचित
शासनाच्या नवीन आकृती बंधानुसार राज्य सरकारचे अखत्यारीतील दवाखाने जिल्हा परिषदेकडे मागील काही महिन्यांपासून वर्ग केले आहेत. येथील इमारत व पायाभूत सुविधांचा विकास व्हावा म्हणून तसा पत्रव्यवहार वरिष्ठांना सादर केला आहे.
- डॉ. अंजली दळवी, पशुधन विकास अधिकारी, कुळे
दवाखाना मागील आठ वर्षांपासून डॉक्टर नसल्याने बंद होता. त्यामुळे आम्हाला खासगी डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार करून घ्यावे लागत होते. त्यात जास्त पैसे खर्च होत होते. दवाखान्यात आता गावात डॉक्टर आहेत. मात्र, येथे आधुनिक दवाखान्याची गरज आहे.
- दिलीप साठे, पशुपालक, कुळे (ता. मुळशी)
02708
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.