पुणे

पौड- कोळवण गटात राष्ट्रवादीचा ऐतिहासिक विजय

CD

कोळवण, ता. ११ : मुळशी तालुक्यातील पौड- अंबडवेट जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्ण वर्चस्व राखले. या गटात राष्ट्रवादीचे मिलिंद नंदकुमार वाळंज यांनी आणि पौड गणात काजल अंकुश मोरे व अंबडवेट गणात प्रवीण धनवे यांनी ऐतिहासिक विजय साकारला.
या गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मिलिंद वाळंज व ठाकरे शिवसेनेचे यांच्यात लढत झाली. ती चुरशीची होईल, अशी अपेक्षा होती. मात्र निकालाची आकडेवारी पाहता वाळंज यांनी एकहाती विजय मिळवल्याचे लक्षात आले. यांना १७ हजार ९५९ मते मिळाली. त्यांचा एकूण ५२९७ अशा विक्रमी मतांनी विजय झाला. वाळंज यांच्या उत्तम नियोजनाने राष्ट्रवादी काँग्रेसचे गणातील दोनही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. या गटात उमेदवारीवरून येथे दोनही पक्षांत नाराजीनाट्य पाहायला मिळाले. मात्र, अखेर वाळंज यांनी पाच हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकांनी विजय मिळवला.
पौड पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे यांच्या कन्या काजल यांनी तालुक्याच्या माजी सभापती कोमल वाशिवले यांचा पराभव केला. याच गणात जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे यांच्या पत्नी पल्लवी या भाजपकडून निवडणूक लढवत होत्या. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेले कंधारे यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता, परंतु त्यांना प्रभाव पाडता आला नाही. याच गणात शिवसेना ठाकरे पक्षाच्या सहसंपर्क संघटिका स्वाती ढमाले यांनी निवडणूक लढविली, परंतु पक्षातून आयात उमेदवार, या नाराजीनाट्याने त्यांच्याही पदरी निराशाच आली. अंबडवेट गणातील मशाल विरुद्ध घड्याळाच्या लढतीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते. येथे राष्ट्रवादीचे प्रवीण धनवे यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन खैरे यांचा पराभव केला. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर सहानुभूतीची किनार या निवडणुकीत होती. तसेच, आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या विकासकामांची पोहोचपावती, योग्य प्रकाराचे प्रचाराचे नियोजन धनवे यांनी केले होते. त्याचा फायदा त्यांना झाला.
दरम्यान, वाळंज यांचे नाव जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतिपदासाठी चर्चेत आले आहे. त्यांनी हा विजय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केला. त्यांनी सांगितले की, आमदार शंकर मांडेकर यांच्या या भागातील विकास कामांचा हा विजय आहे. येथून पुढे या भागातील विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. मायबाप जनतेची जबाबदारी आता आमची असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार आहे, असे वाळंज यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी स्वतः उच्चशिक्षित आर्किटेक्ट आहे. याचा नक्कीच फायदा विकास कामे करताना मला होईल. यासोबतच आमचे घराने मागील चाळीस वर्षांपासून समाजसेवेत आहे. समाजसेवेला कुठे तरी राजकीय आश्रय लागतो, तो मला आता या निवडणुकीत मिळाला आहे. समाजसेवेच्या माध्यमातून माझे वडील नंदकुमार वाळंज (बाबुजी) व आई वत्सला वाळंज हे समाजासाठी काम करत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे समाजसेवेचे व्रत अंगीकारणार आहे. राजकारणातून समाजसेवा करण्याची संधी मला जनतेने दिली आहे, त्याचे नक्कीच मी सोनं करीन.’’

मिलिंद वाळंज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेत पदोन्नतीवरून प्रशासनावर दुजाभावाचा आरोप, आयुक्तांचा खुलासा

Valentine Day 2026: 'व्हॅलेंटाईन डे' फक्त प्रियकर-प्रेयसीसाठी नव्हे, तर कुटुंब अन् मित्रांवरही प्रेम व्यक्त करण्याचा सण!

Valentine Day 2026 Special Recipe: व्हॅलेंटाईन डे ला सकाळी नाश्त्यात पार्टनरसाठी बनवा 'हार्ट शेप सँडविच', नोट करा रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi - कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ ते २० फेब्रुवारी २०२६ - मराठी राशी भविष्य

Marriage Counseling : भावनिक संघर्ष आणि सावरण्याचा मार्ग

SCROLL FOR NEXT