कोळवण, ता. ७ ः नांदगाव (ता. मुळशी) येथे तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंतीची हे १०वे वर्ष असून,
किल्ले तिकोना येथून सकाळी शिवभक्तांनी शिवज्योत आणली. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय,’ ‘हर हर महादेव’, अशा घोषणा देण्यात आल्या.
सकाळी ११ वाजता ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिषेक करण्यात आला. दुपारी ४ ते सायंकाळी ६ यावेळेत शिवाजी महाराजांच्या पालखीची ढोल- ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी ध्येय मंत्र, शिव गर्जना घेण्यात आली. गावातील भजनी मंडळ तसेच, गुरुकृपा गुरुकुल संस्थेच्या विद्यार्थ्यांचा हरिपाठ झाला. सायंकाळी ७ ते ९ कविराज महाराज झावरे यांचे कीर्तन झाले. यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद देण्यात आला. शिवजयंतीचे आयोजन अमितदादा फाले युवा प्रतिष्ठान, शिव प्रतिष्ठान फ्रेंड्स सर्कल, समस्त ग्रामस्थ मंडळी नांदगाव यांनी एकत्रितपणे केले होते.
03040
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.