पुणे

पौड रस्त्यावरील गतिरोधकांच्या कामास सुरुवात

CD

कोळवण, ता. ८ ः पौड- कोळवण रस्त्यावर गतिरोधक बसविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. ‘सकाळ’मध्ये रविवारी (ता. १) ‘पौड- कोळवण रस्त्यावर सतत अपघात’, बातमी प्रसिद्ध होताच तातडीने कामास सुरुवात करण्यात आली.
गतिरोधक बसविण्याचे हे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयआरसीच्या (इंडियन रोड काॅंग्रेस) मानकानुसार करण्यात येत असून, गतिरोधकांची उंची ही १०० मिलिमीटर व रुंदी तीन मीटर आहे. यामुळे गतिरोधकावरून गाडी चालवताना धक्का कमी जाणवतो व गाडीचा वेग देखील नियंत्रित होतो. गतिरोधक बसविल्यानंतर ते लांबून देखील दिसावेत म्हणून त्यावर पांढरे परावर्तित पट्टे मारण्यात येणार आहेत.
या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने, पीएमपीएलच्या बसेस, परिवहन महामंडळाच्या एसटी बस, व्यावसायिक बांधकाम साहित्य वाहतूक करणारे डंपर, मालवाहू ट्रक, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, अशा विविध वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्या वाहनांचा वेगही जास्त व धोकादायक असतो. गतिरोधक बसविल्याने या भागातील रस्त्यावरील प्रवास सुरक्षित होईल.

पौड- कोळवण रस्त्यावर गतिरोधक बसविण्याचे काम सुरू आहे. गतिरोधक हे शासनाच्या नियमानुसार कमी उंचीचे, रुंद व दोनही बाजूंना पसरट उताराचे असावेत. कमी रुंदीच्या उंच गतिरोधकांमुळे वाहने आदळतात व अपघात होऊ शकतो. याची काळजी बांधकाम विभागाने घ्यावी.
- पोपट दुडे पाटील, माजी संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

पौड- कोळवण काशिग या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याचे काम सुरू झाले आहे. पौड ते कोळवणपर्यंत आवश्यक तेथे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात कोळवणपासून पुढे काशिगपर्यंत गतिरोधक बसविण्यात येतील.
- संकेत साळुंके, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुळशी

03045

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT