पुणे

भोर विधानसभा मतदारसंघासाठी ४३ कोटींची तरतूद

CD

कोळवण, ता. ८ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये भोर-मुळशी-राजगड तालुक्यातील ८ रस्ते व पूल कामांना ४२ कोटी ७५ लाख ७१ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील पुढील प्रमाणे रस्ते व पुलांच्या कामांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी; कासुर्डे - हातवे - तांभाड - वेल्हे - धानेप - कादवे - पानशेत किमी रस्ता सुधारणा करणे (ता. राजगड) : २ कोटी ५० लाख रुपये, दासवे-मुठा -कोंढुर-वरसगाव-पानशेत रस्ता २७ किमी सुधारणा करणे (ता. मुळशी, लव्हार्डे ते खारवडे) : ५ कोटी रुपये. वांद्रे - वडूस्ते - वाघवाडी ते प्ररामा ५ रस्ता १४८ किमी सुधारणा करणे (ता. मुळशी, भाग पिंपरी फाटा ते वडुस्ते ) : २ कोटी ५० लाख रुपये. प्रजिमा- ४४ ते भोलावडे शिंद महुडे भानुदसरा १४२ किमीची सुधारणा करणे (ता. भोर) : ७ कोटी रुपये. रामा-११९ ते काळेवाडी - किकवी बांदलवाडी - काळदरी रस्ता १०२ किमी सुधारणा करणे (ता. भोर) : ३ कोटी रुपये. महाड - मढेघाट - वेल्हे - नसरापूर - चेलाडी फाटा रस्ता सुधारणा करणे (ता. राजगड) : ५ कोटी रुपये. दासवे- मुठा-कोंढुर-वरसगाव-पानशेत रस्ता प्रजिमा २७ किमीमध्ये सुधारणा करणे (ता. मुळशी, कोंढूर फाटा ते जांभळी ते कुरण फाटा पानशेत) : १० कोटी रुपये, कोदवडी आसनी दामगुडा रस्ता ग्रामा ७ कालंदी नदीवर पूल बांधणे : ७ कोटी ७५ लाख ७१ हजार रुपये याप्रमाणे निधी मंजूर झाला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT