कोळवण, ता. २७ : लवळे (ता. मुळशी) येथील सिम्बॉयसिस वूमन मेडिकल कॉलेजमध्ये आशा दिनानिमित्त आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा मंगळवारी (ता. २४) सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. मुळशी आरोग्य अधिकारी कार्यालयाने या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते.
ग्रामीण आरोग्य सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या स्वयंसेविकांसाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई शेळके आणि सदस्य काजल मोरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शेळके यांनी आपल्या भाषणातून आशा स्वयंसेविकांच्या कार्याचे कौतुक केले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेविकांचा यावेळी सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी विविध खेळ, समाजप्रबोधनपर गीते, अभंग आणि एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. वामन गेंगजे, सीमा मारकड, राहुल तायडे व संभाजी सातपुते यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
03079
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.